यशदा ग्रंथालयाचे उगमस्थान प्रशासकीय अधिकारी महाविद्यालय मुंबई येथे होते. अधिका-र्यांना प्रशिक्षण देणे हे प्रशासकीय अधिकारी महाविदयालयाचे महत्वाचे उदिदष्ट व कार्य होते.1984 मध्ये प्रशासकीय अधिकारी महाविदयालयाचे पुणे येथे स्थलांतर केले गेले. त्यावेळी याचे नवीन नाव Maharashtra Institute of Development Administration (MIDA) असे ठेवण्यात आले. प्रशासकीय अधिकारी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील ग्रंथसंग्रहाबरोबर ग्रंथालयाचेही स्थलांतर राजभवन पुणे येथे करण्यात आले.
या ग्रंथालयातील पहिले पुस्तक 14/10/1963 रोजी नोंदविण्यात आले. आजपर्यंत (दि. ३१/3/201९) 5३१५६ पर्यंत ग्रंथ नोंदविण्यात आले आहेत. यशदा ग्रंथालयाद्वारे विविध प्रशिक्षण कार्यक्रमांना, संशोधन प्रकल्पांना तसेच माहितीची पुर्तता करण्यात आली.
संग्रह:-
ग्रंथालयामध्ये वेगवेगळया विषयांवरील उत्तम ग्रंथसंग्रह आहे. जसे-लोकप्रशासन, ग्रामीण विकास, संगणक, व्यवस्थापन, लिंगभेद, स्त्रिया आणि मुलांचा कायदा, वृध्दत्व, बचत गट, सहकारी चळवळ, सामाजिक न्याय, वित्त, प्रशासकीय घटना, मानव अधिकार, वातावरण, आपत्ती व्यवस्थापन, जलसंधारण, व्यक्तिमत्व विकास इत्यादी.
विशेष संग्रह:-
- राज्य व केंद्र शासनाचे कायदे.
- शासकीय प्रलेख-नियम, हस्तपुस्तिका व समिती अहवाल इ.
ग्रंथालयामध्ये मराठी व इंग्रजी कादंबऱ्यांचा उत्तम ग्रंथसंग्रह आहे. प्रसिध्द व्यक्तिची आत्मचरित्रे सुध्दा आहेत.
ग्रंथालयाची वेळ:-
ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर प्रशिक्षणार्थ्याना आणि यशदातील अधिकारी वर्गाला, पाहुणे सभासदांना करता यावा यासाठी ग्रंथालय 12 तास उघडे ठेवले जाते. ग्रंथालयाची कार्यालयीन कामकाजाचे दिवशी वेळ- सकाळी 9.30 ते संध्या.10.00 तसेच शनिवारी ग्रंथालयाची कार्यालयीन कामकाजाची वेळ ९.३० ते ५.३० अशी असून रविवार व शासकीय सुट्टी दिवशी ग्रंथालय बंद राहते.
ग्रंथालयाचा वापर:-
ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर प्रशिक्षणाथीं आणि यशदातील अधिकारी वर्गाला, पाहूणे सभासदांकडून केला जातो. यशदातील अधिकारी वर्गाला त्यांची सेवा असेपर्यंत सभासदत्व दिले जाते. ग्रंथालयाकडून प्रशिक्षणाथींना तात्पुरते सभासदत्व दिले जाते. प्रशिक्षणाथीं ग्रंथालयाचा वापर करून ग्रंथ व संदर्भ सेवा मिळवितात. या चालू वर्षात १०५४ प्रशिक्षणार्थींनी ग्रंथालयाचा वापर केल्याचे लक्षात येते.
वर्गणी भरणारे सभासद:-
ज्या प्रशिक्षणाथींना प्रशिक्षण संपल्यानंतर ग्रंथालयाचे सभासदत्व ज्यांना हवे आहे, त्यांना रू.500/- अनामत रक्कम ठेवणे आवश्यक आहे. तसेच वार्षिक सभासद शुल्क रू.500/-देऊन सभासदत्व घेता येते. यशदातील अधिकारी वर्गाने नामनिर्देशित केलेल्या पाहूणे सभासदांना व परराज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना आणि पुणे शहरातील विशेष शासकीय अधिकाऱ्यांना सभासदत्व दिले जाते.
पायाभूत सुविधा :-
ग्रंथालय मध्यवर्ती असावे या संकल्पनेनुसार यशदाचे ग्रंथालय यशदाच्या प्रत्येक विभागाला मध्यवर्ती आहे. पारंबी जवळ असलेल्या प्रवेशद्वारामुळे ग्रंथालयाला वेगळेच रूप आले आहे.
खालील उपक्रमाद्वारे ग्रंथालय अंतर्गत कार्यक्रम पार पाडते