satyamev jayte image
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था
hi
प्रशासकीय प्रशिक्षण संस्था

यशदा ही महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. राज्य शासनाने यशदा प्रबोधिनी ही एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन केली आहे. यशदा महाराष्ट्र राज्याची शिखर प्रशिक्षण संस्था असून राज्य पातळीवरील विविध संस्था व विशिष्ट विषयांशी संबंधित प्राविण्य केद्र यांची संमिश्र रचना असलेली यशदा ही प्रबोधिनी आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे या प्रबोधिनीचे मुख्य संरक्षक असून राज्याचे ग्राम विकास मंत्री हे उपसंरक्षक आहेत. महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव हे यशदा नियामक मंडळाचे अध्यक्ष असतात. प्रबोधिनीचे नियमित कामकाज करण्यासाठी प्रमुख म्हणून भारतीय प्रशासन सेवतील प्रधान सचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी यांची महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात येते. प्रबोधिनीचे प्रशिक्षण कार्यक्रम व इतर कामकाजचे निरिक्षण व पुनरावलोकन यशदाचे महासंचालक अध्यक्ष असलेल्या कार्यकारी समितीकडून करण्यात येते.

यशदाचे मुळ अधिकारी / कर्मचारी, प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणि ठराविक कालावधीसाठी नियुक्त केलेल्या तज्ञांचा व सल्लागारांचा प्रबोधिनीचे व्याख्याते, अधिकारी व इतर कर्मचारी म्हणून समावेश होतो. विद्याशाखा, प्रशासन विभाग, वित्त विभाग आणि इतर सोयीनुसार निर्माण केलेल्या विभागांच्या कामकाजामुळे यशदातील विविध उपक्रम सक्षमपणे पार पाडले जातात. प्रबोधिनीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद / चर्चासत्रे व संशोधनात्मक प्रकल्प यशदातील विविध संस्था व केद्र यांच्यामार्फत यशस्वीपणे राबविले जातात.