आपत्ती व्यवस्थापन केंद्र
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सहाय्याने 1996 या वर्षी यशदाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन केंद्राची स्थापना करण्यात आली.एनआयडीएम,एनडीएमए आणि महाराष्ट्र शासन यांच्यामाध्यमातून केंद्र सरकारने मार्च 2017 पर्यंत राज्यात आपत्ती व्यवस्थापन केंद्राव्दारे राबविण्यात येणाऱ्या जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. एप्रिल 2017 पासून राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन हा भाग महत्वाचा असल्याने शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या व यशदाच्या सहकार्याने केंद्र कार्यरत आहे.
उद्दिष्टे :-
प्रशिक्षण कार्यक्रमाचा सारांश
उद्दिष्टे :-
- आपत्ती व्यवस्थापनाबाबत शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या क्षमतावृघ्दीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करणे.
- राज्य आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आपत्ती व्यवस्थापन बाबत तांत्रिक व सल्लामसलत मार्गदर्शन प्रदान करणे.
- राज्यासंबंधित आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्मपक धोरणे व परिणामकारक संस्थात्मक रचना तयार करण्याच्या दृष्टीने संशोधन आणि सल्लामसलत या माध्यमांचा अवलंब करुन सक्षम करणे.
- भागधारक (Stakeholders) आणि आपत्ती व्यवस्थापनातील व्याख्यातांची व कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी करणे.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा सारांश
अ.क्र. | प्रशिक्षण वर्ष | प्रशिक्षण आयोजन संख्या | एकूण प्रशिक्षणार्थी संख्या |
---|---|---|---|
१ | एप्रिल 2010 ते मार्च 2016 | ३८८ | २३५५७ |
२ | २०१६-१७ | १३३ | ४३०२ |
३ | २०१७-१८ | १७१ | ५८७३ |
४ | २०१८-१९ | १४६ | ५६६१ |
- यशदात आयोजित सर्व पायाभूत प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापन विषय समाविष्ट आहे.
- रुग्णालयाच्या पूर्वतयारीसाठी व सज्जतेच्यादृष्टीने आराखड्याचा विकास करण्यासाठी एकत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम.
- राज्यातील सर्व जिल्ह्यातील सरकारी शाळांना शालेय सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले.
- समुदायासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखड्यासाठी समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम.
- हवामानबदलाचा प्रभावाविषयीचे सर्व प्रशिक्षणे मॉड्युल (Module)च्या माध्यमातून दिले जाते.
- आपत्ती व्यवस्थापनासाठी आपत्ती व्यवस्थापन केंद्राने हाती घेतलेले आपत्ती व्यवस्थापनविषयक कार्य.
- खालील आराखडे विकसित करण्यात आले -
- महानगरपालिका : भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
- विशेष आर्थिक क्षेत्र : अंधेरी सिप्झ – सेझ
- आराखड्याद्वारे केलेले विशाल समुह व्यवस्थापन योजना : गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी उत्सव, नांदेड, पंढरपूर यात्रा, महाकुंभमेळा-नाशिक-2015, श्री शिर्डी साईबाबा संस्थान समाधी उत्सव 2017-2018.
- क्षेत्र अभ्यास: त्सुनामी 2004 आणि ठाणे पुनर्वसन इमारत अग्निसुरक्षा क्षेत्रअभ्यास.
- महाराष्ट्र शासनासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा नियमांचा (DM Act Rule) विकास.
- पेपर सादरीकरण : थायलंड येथे घटना प्रतिसाद प्रणालीवर (IRS) आंतरराष्ट्रीय परिषद, गर्दीचे व्यवस्थापनावर तीरुवंन्तपूरम येथील राष्ट्रीय परिषद.
- सार्क देशातील प्रतिनिधींसाठी बालकेंद्रीत आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन.