पर्यावरण व विकास केंद्र
दिनांक 29 जून 1996 रोजी यशदामध्ये पर्यावरण व विकास केंद्र स्थापन झाले व या केंद्रामुळे संस्थेमध्ये पर्यावरण व विकास या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यास सुरूवात झाली. हे केंद्र भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या तालुका, महानगरपालिका व राज्य स्तरावर प्रशिक्षण, संशोधन व प्रशासकीय विषयावरील प्रशिक्षणाचे काम पहाते.
पर्यावरण व विकास केंद्राने ग्रामिण, नागरी व सुविधा केंद्रातील अधिकारी, अशासकीय, विद्यापीठातील अध्यापक आणि अशासकीय संस्थांच्या पर्यावरणविषयक बाबी व त्यांचे नियोजन यावर प्रामुख्याने भर दिला आहे.
उद्दिष्टये -
- पर्यावरणीय संरक्षण, निसर्ग संरक्षण व विकास प्रशासन या विषयावरील ग्रामीण व नागरी क्षेत्रावर भर देऊन प्रशिक्षण कार्यक्रम व मोडयूलस विकसीत करणे.
- पर्यावरण व विकास या विषयांशी निगडीत घटकांवर शासनाच्या यशस्वी अधिका-यांना, निवडून आलेल्या प्रतिनिधींना, स्वयंसेवी संस्थांना व विद्यापीठातील अध्यापकांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण देणे.
- पर्यावरण व विकास या विषयाशी निगडीत बाबींवर वर्गश्रेणी अधिकारी व अशासकीय संस्था यांचेसाठी संशोधन सुविधा विकसीत करणे, शिष्यवृत्ती व निवासी शिष्यवृत्ती प्रदान करणे.
- कृति आराखडे विकसीत करण्यासाठी चर्चेकरीता संस्था व व्यक्ती यांचेमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
- महाराष्ट्र राज्य जैवविविधता धोरण व कृति आराखडा
- उल्हासनगर महानगरपालिकेकरिता पर्यावरणीय सद्यस्थिती अहवाल
- भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित पर्यावरणीय सद्यस्थिती अहवाल
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकरिता भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित मोजणी
- शिवरी गाव, पुरंदर तालुका, जिल्हा पुणे आणि कवठेपिराण, तालुका व जिल्हा सांगली या गावांतील नैसर्गिक साधनांची भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित मोजणी
- मिहान (नागपूर) प्रकल्पाशी निगडीत मायग्रेटरी बर्डस फ्लायवेज
- बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशिक्षण गरजांचे विश्लेषण
- बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम प्रशिक्षण गरजांचे विश्लेषण