माध्यम व प्रकाशन केंद्र
यशदाच्या प्रकाशन केंद्राची स्थापना 1996 मध्ये झाली.
उद्दिष्टे :-
निर्मिती क्षमता :-
प्रकाशनांचे प्रकार :-
विक्री आणि वितरण :-
यशदाच्या माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रबोधिनीत प्रकाशनांच्या विक्रीसाठी एक विक्री काऊंटर आहे. या मार्फत यशदाच्या प्रकाशनांची विक्री केल्या जाते. त्याचबरोबर पोस्टाद्वारे, ई-मेलद्वारे मागणी करणा-यानाही प्रकाशने पाठविली जातात. ब-याच पुस्तक प्रदर्शनात, प्रशासकीय परिषदांमध्ये सुद्धा प्रकाशनांचे प्रदर्शन मांडल्या जाते. प्रबोधिनीच्या त्रैमासिकांचे 3000 पेक्षा अधिक वर्गणीदार आहेत. त्याचबरोबर या केंद्रामार्फत प्रबोधिनीच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांची प्रसिद्धी वार्तापत्रे, वर्तमानपत्रे, आकाशवाणी आणि दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून केली जाते. यशदा प्रकाशनांच्या अधिक माहितीसाठी प्रकाशनाची यादी पीडीएफ स्वरूपात पाहण्यास उपलब्ध आहे.
प्रकाशनाची यादी
- विकास प्रशासन आणि व्यवस्थापना संबंधित संशोधनाच्या निष्कर्ष आणि शिफारशींच्या प्रसिद्धीसाठी एक मंच प्रदान करणे;
- सार्वजनिक / विकास प्रशासनाच्या कामकाजाविषयी माहिती प्रसारित करणे. प्रबोधिनीच्या कार्याविषयची माहिती प्रकाशित करणे.
निर्मिती क्षमता :-
- माध्यम व प्रकाशन केंद्रामध्ये प्रकाशन, प्रसिद्धी, पत्रकारिता, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव असणा-या व्यक्ती कार्यरत आहेत.
- अनुभवी विद्याशाखा सदस्य संपादकीय कामकाजासाठी मदत करतात. तसेच लेखकांना लिखाणासंदर्भात मानधन देण्याबाबतचे धोरण अस्तित्त्वात आहे.
- या केंद्रात प्रगत संगणक हार्डवेअर आणि डीटीपी सॉफ्टवेअर आहेत. रीप्रोग्राफिक्स रेट कॉन्ट्रॅक्टद्वारे नियुक्त केलेल्या पुण्याच्या काही नामांकित मुद्रण संस्थांच्या पॅनेलमार्फत संस्थेतील छपाईची कामे केली जातात.
- विविध प्रकारच्या प्रकाशनांच्या नियमित प्रकाशनासाठी सुनिश्चित अशी कार्यपद्धती व्यवस्थितपणे स्थापित करण्यात आली आहे.
प्रकाशनांचे प्रकार :-
- ॲकॅडमीचे दोन त्रैमासिके - अश्वत्था (इंग्रजी) आणि यशमंथन (मराठी) ही दोन त्रैमासिके नामांकित व्यवस्थापन विकास संस्था, संशोधन व प्रशिक्षण संस्था, सरकारी अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि विकास प्रशासनाशी संबंधितांना वर्गणीदार करून नियमितपणे पाठविले जातात.
- विकास प्रशासनाशी व इतर प्रशासकीय सार्वजनिक जीवनप्रणालीच्या संदर्भात आतापर्यंत संबंधित विविध विषयांवर 50 हून अधिक पुस्तके या केंद्रामार्फत प्रकाशित करण्यात आली आहेत.
- प्रबोधिनीच्या प्रख्यात विद्याशाखा अधिकारी आणि वरिष्ठ लोकप्रशासकांनी लिहिलेले ही पुस्तके आहेत.
- प्रबोधिनीच्या अल्प आणि दीर्घ मुदतीच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण वाचन साहित्य आणि प्रशिक्षण मोड्यूल्स वापरले जातात.
- प्रबोधिनीचे इंग्रजी आणि मराठी भाषेतील वार्तापत्रे, माहिती पुस्तिका आणि वार्षिक अहवाल इ. या केंद्रामार्फत प्रकाशित करण्यात येतात. त्या मधूनही प्रबोधिनीच्या घडामोडींची माहिती प्रसारीत केली जाते.