satyamev jayte image
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था
hi
सहकार प्रशिक्षण व संशोधन केंद्र

सहकार चळवळीचा विकास खूपच नेत्रदीपक असून सहकार एक स्वतंत्र क्षेत्र म्हणून पुढे येत आहे व भारताच्या आर्थीक उन्नतीत त्याचा मोठा सहभाग आहे. सहकार चळवळीत महाराष्ट्र राज्य अग्रभागी आहे. एका बाजूने सहकार चळवळ यशस्वी असली तरी दुस-या बाजूने सहकार चळवळीला प्रखर टिकेला सामोरे जावे लागत आहे आणि हे काही सहकारी संस्थांच्या गैर-व्यवस्थापनाच्या, गैरवर्तन तसेच अपयशामुळे घडत आहे. महाराष्ट्र राज्याला देशात आपले अव्वल स्थान प्राप्त करण्यास सक्षम करण्यासाठी यशदाने सहकार क्षेत्रातील सर्व संबधीतांच्या क्षमता बांधणीवर जोर देण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने व ते प्राप्त करण्यासाठी त्या अनुषंगाने मोठया प्रमाणावर सहकारी बँका / सहकारी पतसंस्था / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका / कृषि उत्पन्न बाजार समिती यांचे पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे होते व त्या दृष्टीने सहकार प्रशिक्षण व संशोधन केंद्राची स्थापना करण्याची आवश्यकता होती व या पार्श्वभूमीवर दिनांक 7 एप्रिल 2004 रोजी सहकार प्रशिक्षण व संशोधन केंद्राची यशदामध्ये स्थापना करण्यात आली आहे.

लक्ष्य :
सहकार प्रशिक्षण व संशोधन केंद्रमार्फत सहकार क्षेत्रातील मानव संसाधन विकासाच्या प्रकियेचे सुलभीकरण प्रशिक्षण, संशोधन व सल्ला सेवा याद्वारे करणे.

ध्येय आणि उद्दिष्टे :
  1. सहकार क्षेत्रातील व सहकार विभागाच्या प्रशिक्षण गरजांचे विश्लेषन करणे व प्रशिक्षण आराखडा करणे.
  2. पदाधिकारी व अधिकारी-कर्मचारी यांची प्रशिक्षणाच्या माध्यमातून क्षमता बांधणी करणे.
  3. सहकार क्षेत्राशी संबधित कृती संशोधन प्रकल्प राबविणे.
  4. सहकार चळवळीतील यशस्वी उपक्रमांचा शोध घेणे व त्यांचे प्रलेखन करून ती माहिती सर्व संबधीतांपर्यत पोहचविणे.
  5. सहकार क्षेत्रातील सुप्रशासनावरील अभ्यास हाती घेणे.
  6. सहकार क्षेत्राला सल्ला सेवा प्रदान करणे.
उपक्रम :
  1. जिल्हा मध्यवर्ती / नागरी सहकारी बँक, सहकारी पतसंस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती, दुग्ध विकास सहकारी संस्था व बलुतेदार संस्था यांचे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
  2. सहकार विभागाच्या प्रशासन व लेखापरिक्षण या शाखांच्या क्षेत्रीय कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेणे.
  3. सद्य स्थितीवर आधारित एक दिवसीय कार्यशाळांचे आयोजन करणे.
  4. सहकार विभागाच्या अधिका-यांसाठी तसेच सहकारी संस्थांसाठी पायाभूत, बढती नंतरचे, बदलीनंतरचे व विषय तोंडओळख प्रशिक्षण आयोजित करणे.
  5. प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करणे.
कार्यवाही :
  1. विविध प्रशिक्षण मॉडयूल्स तयार करण्यात आलेले आहेत.
  2. मराठी भाषेत सहा प्रकारचे वाचन साहित्य तयार करण्यात आले आहेत.
  3. आदर्श / यशस्वी सहकारी संस्थाचे प्रलेखन केले आहे.
  4. सहकार क्षेत्रातील समस्यांचा शोध घेउून त्यावर कृती संशोधन सुरू केले आहे.
  5. सहकार क्षेत्रातील यशस्वी उपक्रमांना अभ्यास सहलीचे आयोजन .
  6. बहिस्थ: प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन .
  7. अभ्यासवर आधारीत कामकाजामध्ये सुधारणा सुचविणे.
  8. सुचना / हस्त / मार्गदर्शन पुस्तिका तयार करणे.
  9. व्यवस्थापन विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
  10. सहकार क्षेत्रातील व्यक्तींना संबद्ध / एकत्र करणे.
पदसोपान :
  1. सहाय्यक / सहयोगी प्राध्यापक तथा प्रभारी अधिकारी / संचालक: 1
  2. संशोधन अधिकारी :1
  3. संशोधन सहाय्यक : 1
  4. सत्र सहयोगी : 1
  5. सत्र सहाय्यक : 2

  6. एकूण पदसंख्या : 6
लाभार्थी गट:

खालील सहकारी संस्थाचे पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी:

  1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
  2. नागरी सहकारी बँका
  3. नागरी सहकारी पतसंस्था
  4. कर्मचारी सहकारी पतसंस्था
  5. कृषी उत्पन्न बाजार समिती
  6. सहकारी साखर कारखाने
सॉट विश्लेषण :

अ. जमेच्या बाजू / सामर्थ्य
  1. सर्व प्रशिक्षण कार्यक्रम सहकारी संस्थांद्वारा प्रायोजित आहेत.
  2. लोक केंद्रीत व विकासात्मक काम आहे.
ब. कमकूवत बाजू / कमकूवतपणा
  1. पूर्णत: सहकार संस्थांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे.
क. संधी :
  1. राज्य प्रशिक्षण धोरण राबविणे
  2. वित्तीय संस्था, कृषी पणन, पीक काढणी पश्चात तत्रंज्ञान, प्रवाही तत्रंज्ञान, नेतृत्व विकास व लोकशाही प्रकीया इ. संबधित प्रशिक्षण, संशोधन व सल्ला सेवा.
ड.धोके :
  1. अन्य प्रशिक्षण संस्थापासून असलेली स्पर्धा.