जलक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या गौरवपूर्ण कार्याच्या स्मरणार्थ दरवर्षी जलभूषण पुरस्कार अदा करणेबाबत.दि. 13 मे, 2022 च्या शासन निर्णयानुसार मागील 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या एक वर्षाच्या कालावधीतील केलेल्या कामाबाबत नामांकने Online पध्दतीने सादर करण्याबाबत.
जलक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण
यांच्या गौरवपूर्ण कार्याच्या स्मरणार्थ ‘जलभूषण पुरस्कार’
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्वर्गीय डॉ.शंकराव चव्हाण राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद व विधान सभा अशा केंद्र व राज्यातील चारही प्रतिनिधीगृहांचे सन्माननीय सभासद राहिलेले आहेत.महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असलेले माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांची कारकीर्द अविस्मरणीय व स्पृहणीय अशीच आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंदतीर्थ यांनी सत्ता ही बहुजन हितार्थ राबवावी हा दिलेला कानमंत्र आदरणीय चव्हाण साहेबांनी अखेरपर्यंत सांभाळला. अपार दूरदृष्टी, शुन्यातून विश्व निर्माण करण्याचे समर्थ, कर्तृत्व, लोकाभिमुख, कामात पूर्ण झोकून देऊन काम, उत्तम प्रशासन, निष्कलंक चारित्र्य व वैचारिक समन्वय साधण्याची वृत्ती, अजोड कर्तव्यनिष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेधक वैशिष्टये होत.
"पाणी अडवा पाणी जिरवा" ही त्यांची घोषणा जलक्षेत्रासाठी बोधवाक्य ठरली. जलक्रांतीचे जनक असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो. अनेक पाटबंधारे प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी त्यांनी घेतलेल्या अथक व अभ्यासपूर्ण परिश्रमांमुळे त्यांना आधुनिक भगीरथ म्हणून देखील आदराने गौरविण्यात येते. त्यांचे व्यक्तिमत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व समाजाला सदैव जलक्षेत्रातील सर्जनशीलतेसाठी, उद्यमशीलतेसाठी सदैव प्रेरणा देत राहील हे निश्चित आहे. त्यांच्या कार्यकालावधीत महाराष्ट्र राज्याने जलक्षेत्रात भरीव कामगिरी केली हे सर्वश्रुत आहे.
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण या थोर पुरुषाच्या गौरवपूर्ण कार्याच्या स्मरणार्थ जलसंपदा,जलसंधारण आणि पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या व्यक्ती/संस्था यांना दरवर्षी जलभुषण पुरस्कार प्रदान करण्यांचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच यापुढे हे पुरस्कार दोन वर्गांसाठी देण्यात येणार आहे.
अ) खाजगी व्यक्ती / संस्थाकरिता / सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी
- प्रथम क्रमांक: रुपये 1,00,000/- (एक लक्ष रुपये मात्र ) रोख आणि प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह
- द्वितीय क्रमांक :रुपये 75,000/- (पंच्याहत्तर हजार रुपये मात्र) रोख आणि प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह
- तृतीय क्रमांक: रुपये 50,000/- (पन्नास हजार रुपये मात्र) रोख आणि प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह
- या वर्गवारी अंतर्गत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येऊन त्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.
सदर पुरस्काराची निवड करण्यासाठी करावयाचे नामनिर्देशन/नामांकन अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येणार असून दि. 13 मे 2022 चा शासन निर्णयानुसार पुरस्कारार्थींची निवड केली जाणार आहे.
जलक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या गौरवपूर्ण कार्याच्या स्मरणार्थ दरवर्षी जलभूषण पुरस्कार अदा करणेबाबत.दि. 13 मे, 2022 च्या शासन निर्णयानुसार मागील 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या एक वर्षाच्या कालावधीतील केलेल्या कामाबाबत नामांकने Online पध्दतीने सादर करण्याबाबत.
स्व. डॉ. शंकरराव चव्हाण (Late Shankarrao Chavan)
श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री, भारताचे संरक्षणमंत्री गृहमंत्री, शिक्षणमंत्री, अर्थमंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, पाटबंधारे मंत्री आदी महत्त्वाच्या पदावरून उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य केले. इ.स. 1960 ते 2000 या चाळीस वर्षाच्या काळात डॉ. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाला आणि विशेषता शेतीच्या पाणीपुरवठ्याला खंबीरपणे दिशा देऊन त्यामध्ये नियोजनबद्धता आणली.
राज्याच्या जलसिंचनाची घडी बसविण्यासाठी त्यांनी कोयना, जायकवाडी, उजनी, मांजरा, वारणा, सिद्धेश्वर, पेंच, भातसा, येलदरी, अप्परवर्धा, वरसगाव, चासकमान, दुधगंगा-वेदगंगा, हतनुर, मनार, इसापुर, विष्णुपुरी इत्यादी अनेक मोठ्या धरणांची उभारणी केली. जलक्षेत्रात समन्यायी पाणीवाटपाचे धोरण उराशी बाळगून नेहमी शाश्वत विकासाची कास धरली. याकरिता त्यांनी समतोल विकासाच्या हेतूने दुष्काळग्रस्त भागात लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणून हरितक्रांतीला चालना दिली. शेतीबरोबरच महाराष्ट्रातील शेकडो शहरात आणि हजारो गावात पिण्याचे पाणी उपलब्ध करून महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली. महाराष्ट्रातील जलसिंचन निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणूनच त्यांना महाराष्ट्राच्या जलक्रांतीचे जनक असे संबोधले जाते.
त्यांनी केलेल्या जलसिंचन क्षेत्रातील क्रांतीमुळे स्वातंत्र्योत्तर काळात शेतीतील उत्पादनात वाढ झाली व शेतीवर आधारित उद्योगाला गती मिळाली. सिंचन क्षेत्रात काम करणारे व पाण्यासारखी स्वच्छ प्रतिमा असणारे डॉ. शंकरराव चव्हाण हे नवनिर्मिती करण्याची प्रचंड क्षमता असणारे नेतृत्व होते. 1958 साली स्वतंत्र पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर इ.स.1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन पाटबंधारे खात्याचे मंत्री डॉ. शंकरराव चव्हाण व अर्थतज्ज्ञ श्री स.गो बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली भविष्यकालीन सिंचनाची दिशा व धोरणे आखण्यासाठी महाराष्ट्र सिंचन आयोग नेमण्यात आला. या आयोगाच्या निर्मितीनंतर राज्यातील सिंचन प्रकल्पाला गती आली. डॉ. शंकरराव चव्हाण हे पाटबंधारे मंत्री असताना दिनांक 8 मार्च 1964 रोजी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यातील जलसिंचन आणि विद्युत निर्मिती या विषयावर करार झाल्यामुळेच दोन्ही राज्यांमध्ये प्रकल्प उभारणीतून हरितक्रांती घडून आली.
डॉ. शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील अस्तित्वात असलेल्या व संभाव्य सिंचन प्रकल्पांचा 'मास्टर प्लॅन' तयार करून घेतला. त्याआधारे दिनांक 6 ऑक्टोंबर 1975 रोजी आंध्रप्रदेश व महाराष्ट्रात गोदावरी व मांजरा खोऱ्यातील पाणी वाटपाचा करार झाला. या करारातून त्यांनी महाराष्ट्राला 133 टी.एम.सी. पाणी वापरण्याची मुभा मिळवून दिली. पाण्याचे समान वाटप होण्यासाठी त्यांनी तूट असलेल्या नदीखोऱ्यात बाजूच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी आणले. महाराष्ट्रात त्यांनी पैनगंगा - गोदावरी ,पूर्णा- गोदावरी, मनार - गोदावरी खोरे जोडून आधुनिक काळात नदीजोड संकल्पनेची उपयुक्तता दाखवून या संकल्पनेला चालना दिली.
राज्यातील पाण्याची गरज ओळखून महाराष्ट्रात प्रकल्पांची निर्मिती करताना प्रकल्पासोबतच जलवितरण व्यवस्था भक्कम केली, तरच प्रकल्पाची क्षमता कायम राहील असे त्यांचे कायम सांगणे असे. प्रकल्पात गाळाचे प्रमाण कमी व्हावे व महाराष्ट्रात भूजल साठा वाढविण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जल व मृद संधारणाची कामे व्हावीत, याबाबत ते आग्रही असत. केवळ नवीन प्रकल्प उभा करुन चालणार नाही तर आपल्या महाराष्ट्रातील जुन्या पाण्याचे स्रोत पुनर्जिवित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. महाराष्ट्रातील पाण्याचा पर्याप्त वापर होण्यासाठी सामान्य नागरिकांनी पाण्याचे महत्त्व समजून पाण्याची बचत व पुनर्वापर करावा विशेषतः शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा असे सातत्याने सुचवले.
दोन राज्यांतर्गत व राज्यातील जिल्ह्याचे पाणीवाटपाचे प्रश्न सोडवताना पाणी नियोजनासाठी आराखडा त्यांनी घालून दिला. त्यांनी जे काम अत्यंत अल्पकालावधीत उभे केले, ते आजच्या घडीला प्रगत विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीची जोड देऊनही आव्हानात्मक वाटते, यातच त्यांच्या कार्याची गरुडभरारी दृष्टोत्पत्तीस येते.
डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या अद्वितीय कार्यातून आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून महाराष्ट्रातील युवा पिढीला सतत प्रेरणेची संजीवनी लाभेल आणि त्यामुळे राज्याच्या जलक्षेत्रातील विकासाला अखंड प्रगतीपथावर नेण्याचा मार्ग अधिक प्रशस्त होईल, हे निश्चित !
जलक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या गौरवपूर्ण कार्याच्या स्मरणार्थ दरवर्षी जलभूषण पुरस्कार अदा करणेबाबत.दि. 13 मे, 2022 च्या शासन निर्णयानुसार मागील 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या एक वर्षाच्या कालावधीतील केलेल्या कामाबाबत नामांकने Online पध्दतीने सादर करण्याबाबत.
जलक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या गौरवपूर्ण कार्याच्या स्मरणार्थ
‘जलभूषण पुरस्कार’
आपल्याला लॉगिन करावे लागेल. याचा वापर अर्ज दाखल करण्यासाठी करता येईल (अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत).
लॉगिन आयडी (Login Id) असल्यास तुमच्या खात्यावर जाऊन अर्ज सादर करण्यासाठी इथे क्लिक (Click) करा लॉगिन (Login
अर्ज कसा भरावा या बाबत येथे माहिती मिळेल.
संपर्क:9604355833
ई-मेल : jalbhushan.award202223@gmail.com
पात्रता निकष (Eligibility Criteria)
महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा, जलसंधारण आणि पाणी पुरावठा क्षेत्रात काम करणाऱ्या खाजगी वा अशासकीय व्यक्ती/संस्था, शासकीय कर्मचारी /अधिकारी अर्ज करु शकतील.
सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर खाजगी वा अशासकीय व्यक्ती /संस्था या पुरस्काराच्या वर्गवारीमधून नामांकने सादर करावयाची आहेत.
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
पॅनकार्ड,आधारकार्ड,स्मार्टकार्ड प्रकारचे ड्राईव्हिंग लायसन्स,मतदान ओळखपत्र,पासपोर्ट यापैकी एक ओळखपत्र पडताळणीसाठी अनिवार्य असेल.
अर्ज/नामांकने केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील.
महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा, जलसंधारण आणि पाणी पुरावठा क्षेत्रात काम करणाऱ्या खाजगी वा अशासकीय व्यक्ती/संस्था, सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी मागील वर्षात (1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत) केलेल्या उल्लेखनिय कामाची माहिती ऑनलाईन अर्जात योग्य त्या ठिकाणी नमूद करावी.
अर्ज कसा भरावा ? (How to fill Application Form)
"स्वर्गीय शंकरराव चव्हाण" जलभूषण पुरस्कार बाबतचा दिनांक 13 मे 2022 चा शासन निर्णय व अर्ज काळजीपूर्वक वाचावा मगच अर्ज भरण्यास सुरूवात करावी.
अर्जात माहिती भरताना ती माहिती प्रत्यक्ष केलेल्या कामावर आधारित, वस्तुनिष्ठ आणि सत्य असावी.
पुरस्कारांच्या वर्गवारीनुसार असलेल्या प्रश्नावलींमध्ये आपण आपल्या कामांची माहिती भरावी.पुरस्कारांच्या वर्गवारीनुसार असलेल्या प्रश्नावलींमध्ये आपण आपल्या कामांची माहिती भरावी.
प्रश्नावलीमधील प्रत्येक मुद्दयासाठी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या शब्दांच्या मर्यादेत माहिती देता येईल.
प्रश्नावलीमध्ये दिलेल्या प्रश्नांबाबत व माहितीबाबत पूरक वृत्तपत्र कात्रणे, फोटो, इतर माहिती अपलोड करता येईल.
दोन किंवा जास्त फोटो किंवा फाईल असल्यास झिप फाईल करुन अपलोड करावी. झिप फाईल्सची नावे इंग्लिशमध्ये द्यावी . (फाईल झिप कशी करावी हे इंटरनेटवर शोधावे.)
एकच फोटो किंवा फाईल अपलोड करावयाची असल्यास आहे त्या स्वरुपात अपलोड करता येईल.
झिप फाईल अपलोड करावयाची मर्यादा 100 एमबी असेल.
आपल्या कामाचा व्हिडीओ असल्यास तो देखील अपलोड करता येईल.
व्हिडीओ अपलोड करावयाची मर्यादा 100 एमबी असेल.