- राज्य शासन सेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून प्रशासनाची गतिमानता वृद्धिंगत करण्यासाठी राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारीवृंद यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता विचारात घेऊन त्यासाठीची यंत्रणा व व्यवस्था उपलब्ध्द करुन देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण जाहीर केले आहे. या प्रशिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी यशदा पुणे येथे राज्य प्रशिक्षण नियोजन व मूल्यमापन यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. राज्यातील सर्व विभागीय, जिल्हा स्तरीय तसेच विविध विभागांच्या प्रशिक्षण संस्थांचे समन्वयाचे व मूल्यमापनाचे काम या यंत्रणेमार्फ़त केले जाईल.